We Have The Most Beautiful World Within Peace Of Mind....Just Try To Understand.... And Feel And Utilize.........It Always Follows You.......!
Saturday, March 14, 2026
नशा - अकाली जीवन अंत्ययात्रा
व्यसनाधिनता ही जबरदस्त जीवन घातकी किड-दिमक आहे, ज्यामुळे आयुर्मान कमी करणे व दारिद्र्यला आमंत्रित करून कुटुंबातील उर्वरीत सदस्य आणि जोडीदार यांना कधीही न संपणाऱ्या अंधाराच्या गुहेत ढकलण्याइतके गंभिर सत्य आहे.
अडाण्यापासुन उच्चशिक्षित वर्गातील तरुणांचा समावेश यात आपणास पाहायला मिळतो. अलीकडे युवकांमध्ये सर्वच प्रकारचे व्यसन वाढलेले आहे. त्यामुळे आपली प्रतिमा डागाळली जाते. समाजामध्ये असलेले स्थान, दर्जा टिकवायचा की त्याला सुरुंग लावायचा हे आपल्याच हातात असते. आपल्यामुळे कित्येकांची मने दुखावली जातात. आपण आपल्या मनमानीने वागतो. पण त्याचा इतरांना काय त्रास होतो, याचे आपण कधी आत्मपरीक्षण करत नाही.
राहण्याच्या ठिकाणाचा विपरित मौहोल, वाट चुकलेले मित्रपरिवार आणि नकारात्मक परिस्थिती या गोष्टी व्यसनाधिनतेला पूरक ठरतात.
व्यसनापासून चार हात लांब राहणे हा सुंदर जीवनाचा आस्वादी मूलमंत्र आहे.
एकदा का व्यक्ती व्यसनाच्या जाळ्यात गेला , त्याची वापसी नगण्य.
मौज आणि हौस म्हणून कधी कधी विविध आनंदमय कार्यक्रमांमध्ये केली जाणाऱ्या या जीवघेण्या चेष्टेवर पालकांनी वेळीच आवर घालणं अती आवश्यक असते. व्यसनाधिनता ही तात्कालिक आनंद देणारी प्रकृतीच्या विरूद्ध मार्गास नेणारी एक राक्षसी वृत्ती आहे.
वर्तमान तरुणांनी आनंदासाठी अव्यवहार्य मार्ग कदापि निवडू नयेत वा त्यांना बळी पडू नये. आपोआप किंवा कालांतराने व्यसन निर्वाणाची शक्यता नसतेच.
केवळ नारदमुनी भेटले म्हणून वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. असे प्रत्येका बरोबर नाही होऊ शकत. व्यसनाच्या आहारी गेलेली लोकं रात्रंदिवस स्वतःच्या आनंदासाठी जगतात. आपल्या जवळच्या व्यक्तींचा विचार करत नाहीत. आपल्या संसारावर, मुलाबाळांबर, आई-वडिलांवर जर त्याचे विपरीत परिणाम घडत असतील, तर असा उपदव्याप काय कामाचा ? त्यातून त्यांचं मानसिक संतुलन बिघडून आयुष्याचा एकूणच जीवन आलेख बिघडतो. यापेक्षा निपुत्रिक असणे बरे.
वेळ मारून न नेता या गंभीर परिस्थितीत पालकांचे किंवा व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकांमार्फत समुपदेशन करून घ्यावे व या जीवघेण्या जाळ्याच्या विळख्यातून बाहेर पडावे. उपयोगी व आवडते छंद जोपासावेत. सकारात्मक कार्यमग्नता असावी. व्यसन परावृत्तीसाठी परिणाम कारक मार्गांचा अवलंब करावा.
परंतु या ऐवजी धाडसी पण निरुपयोगी असे निर्णय अलीकडे आपल्या आजुबाजूला पाहायला मिळतात.
व्यसनी व्यक्तीस कुटुंबातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अथवा लग्न करून देणे हा त्याच्यावरचा रामबाण उपाय होऊच शकत नाही. पण समाजातील बुजुर्ग व्यक्ती कधी कधी असे अव्यावहारिक उपदेश देतांना दिसतात. आणि यामुळे आईवडिलांच्या आज्ञाधारक तरुणींच्या आयुष्याचे वाटोळ्याची निश्चिती केली जाते. ही तर विषपरीक्षा आहे, त्यातून शेवटी निराशा आणि शोकांतिकाच मिळणार.
यांवर परिणाकारक उपाय म्हणजे विवाह जुळविताना चौकस असणे. मुलींनी उत्तम दर्जाचे व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग निवडणे. दुर्दैवाने नशिबी मद्यपी आलाच तर शैक्षणिक, व्यावसायिक गुणवत्ता असल्यामुळं पुढील जीवनाची वाताहत लागणार नाही. आत्मनिर्भर असल्यामुळे होऊ घातलेली विपरीत परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे धाडस कोण करणार नाही.
माझ्या गुरूचा उपदेश: आयुष्यभर आईवडिलांच्या आयत्या संपत्तीवर जगलात तरी चालेल पण कोणत्याच व्यसनाच्या आहारी जाऊ नका. वयोवृद्ध मातापित्यांना आपल्या काळजाच्या तुकड्याचा आयुष्याचा व्ह्रास आणि अंत पचविणे हे नरकयातना पेक्षा कमी नाही.
: स्नेहयश.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment